Education that reaches beyond the campus: schemes and service for the people of Parbhani.
Students take part in National Service Scheme (NSS) and National Cadet Corps (NCC) activities such as blood donation camps, eye donation awareness and tree plantation drives. The trust also runs these initiatives:
Yoga for senior citizens
ज्ञानसाधना योग मित्र मंडळ
या संस्थे मार्फत शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी 'ज्येष्ठ नागरिकांना ‘ ज्ञानसाधना योग मित्र मंडळ ' या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्ञानसाधना योग मित्र मंडळ, वयाच्या उत्तरार्धातही प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने निरोगी, स्वावलंबी आणि आनंददायी आयुष्य जगावे, या ध्येयाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. वाढत्या वयासोबत शरीरात अनेक बदल होतात. सांधेदुखी, अपचन, अपुरी झोप, थकवा किंवा मानसिक ताण यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. अशा वेळी कठीण व्यायाम करणे प्रत्येकालाच झेपते असे नाही. म्हणूनच, आम्ही विशेषतः ६० वर्षांवरील साधकांसाठी अत्यंत सुरक्षित, सोपी आणि शास्त्रोक्त योग साधना डिझाइन केली आहे. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना योग करण्याची इच्छा असते, पण "माझ्या वयात हे जमेल का?" किंवा "मला दुखापत तर होणार नाही ना?" अशी भीती वाटते. आमचा उद्देश हीच भीती दूर करून, त्यांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार योग्य ते मार्गदर्शन करणे हा आहे. वयाची साठी किंवा सत्तरी ओलांडल्यानंतरही योगाच्या माध्यमातून औषधांशिवाय उत्साही कसे राहावे, हे शिकवणे हेच आमचे ध्येय आहे.
Women empowerment
सावित्री मंच
महिला सक्षमीकरण (Women Empowerment)
हा समाजाच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाचा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. महिलांना त्यांचे जीवन स्वतःच्या अटींवर जगण्याचे स्वातंत्र्य देणे, त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करणे आणि समाजात समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे महिला सक्षमीकरण होय. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ महिलांना हक्क देणे नव्हे, तर त्यांना आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि मानसिकदृष्ट्या इतके मजबूत करणे की त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील. शतकांपासून चालत आलेल्या रूढी-परंपरांच्या बेड्या तोडून महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाचे स्थान देणे हाच या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. महिला सक्षमीकरण याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही या संस्थे मार्फत “सावित्री मंच “ या सेवाभावी उपक्रमाची प्रतीष्टापणा केलेली आहे. एक महिला सुशिक्षित आणि सक्षम झाली, तर संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने संपूर्ण समाज प्रगती करतो. या धारणेस आधार ठेऊन सावित्री मंच मार्फत महिलांसाठी उपक्रम राबविले जातात.
Free residential education
बळीराजा सन्मान योजना
ज्ञानसाधना प्रतिष्ठान एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन परभणी या संस्थे मार्फत शेतमजूर, अल्पभूधारक,भूमिहीन शेतकरी, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य, गरीब व होतकरू विद्यार्थी यांचे साठी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबवली जाणारी मोफत निवासी शिक्षण योजना.
Student adoption scheme
विद्यार्थी दत्तक योजना
ज्ञानसाधना प्रतिष्ठान एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन परभणी या संस्थे मार्फत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी आणि पैशांभावी कोणत्याही हुशार विद्यार्थ्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही 'विद्यार्थी दत्तक योजना' राबवत आहोत. ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे पण पुढे जाण्यासाठी आर्थिक पाठबळ नाही. गोर-गरीब, गरजू, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य, गरीब व होतकरू विद्यार्थी दत्तक योजना' ही समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबवली जाणारी एक अत्यंत संवेदनशील आणि कल्याणकारी योजना आहे.
Tree plantation
वृक्षारोपण उपक्रम
ज्ञानसाधना प्रतिष्ठान एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन परभणी या संस्थे मार्फत वृक्षारोपण उपक्रम (Tree Plantation Initiative) "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..." संत तुकारामांच्या या अभंगाप्रमाणे झाडे ही आपली खरी सोयरे (नातेवाईक) आहेत. आज वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हवामान बदल (Climate Change) यांमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. या जागतिक समस्येवर 'वृक्षारोपण' आणि 'वृक्षसंगोपन' हाच एकमेव प्रभावी आणि शाश्वत उपाय आहे. आपली संस्था केवळ झाडे लावण्यावर नाही, तर ती जगवून त्यांचे मोठे वृक्ष होईपर्यंत संगोपन करण्यावर भर देते.
Earn and Learn scheme
कमवा व शिका योजना
ज्ञानसाधना प्रतिष्ठान एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन परभणी या संस्थे मार्फत वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आर्थिक स्वावलंबनासाठी 'कमवा व शिका' योजना (Earn and Learn Scheme) हा उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेला एक अत्यंत महत्त्वाचा आणि स्वाभिमानी सामाजिक उपक्रम आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सुरू झालेली ही योजना विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आर्थिक स्वावलंबन शिकवते. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थितीअभावी अनेक हुशार विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशा होतकरू विद्यार्थ्यांना मानाने आणि स्वाभिमानाने शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी 'कमवा व शिका' योजना राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच अर्धवेळ (Part-time) काम करून स्वतःचा शैक्षणिक खर्च स्वतः उचलण्याची संधी देणे हा आहे.
Also from the trust
More initiatives
Dnyansadhana News Networkज्ञानसाधना न्युज नेटवर्क
Visits of dignitariesज्ञानसाधना प्रतिष्ठानला दिलेल्या मान्यवरांच्या भेटी